राष्ट्रवादीच्या मूळ विचारांशी कधीही तडजोड करणार नाही – खा.प्रफुल पटेल


  • भव्य बाईक रैली व जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करून खा. श्री पटेल यांचा भव्य स्वागत. 

गोंदिया, दी. 24 ऑगस्ट : गोंदिया येथे खासदार प्रफुल पटेल यांचा मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रैली व कार्यकर्त्यांकडून जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करण्यात आला. एन. एम. डी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने जोश व उत्साहात उपस्थिती दर्शवून खासदार प्रफुल पटेल यांच्याप्रती विश्वास व एकजुटता दाखवून यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. खा. प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली.



 

गोंदिया व भंडारा जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा विचार केला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा म्हणजे माझे कुटुंब आहे. या कुटुंबात कोणावरही अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा, जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकरी व शेतमजूर सक्षम व्हावा समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. विकासासाठी जे काल झाले तेच आज झाले तर त्यात गैर काय. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आमचे दैवत आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेशी कधीही तडजोड करणार नाही अशी ग्वाही कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना प्रफुल पटेल यांनी दिली.



 

मेळाव्याला खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, रमेश ताराम, रविकांत बोपचे, पुरुषोत्तम पांडे, केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर, रफीक खान, प्रभाकर दोनोडे, डॉ अविनाश जायस्वाल, हुकूमचंद अग्रवाल, गणेश बरडे, योगेंद्र भगत, अजय गौर, मनोज डोंगरे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, यशवंत परशुरामकर, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर,

पूजा अखिलेश सेठ, अश्विनी पटले, नेहा तुरकर, जगदीश बावनथडे, किरण पारधी, सुधा राहंगडाले, मोहन पटले, प्रेमकुमार राहंगडाले, केवल बघेले, लोकपाल गहाने, अविनाश काशिवार, अजय उमाटे, नीरज उपवंशी, अशोक शहारे, सतीश देशमुख, किशोर तरोणे, अजय लांजेवार, सुशीला भालेराव, माधुरी नासरे, जिब्राइल पठान, रजनी गिरहपुंजे, ममता बैश, पारबता चांदेवार,

रजनी गौतम, जया धावड़े, कल्पना बाहेकर, सिमा शेंडे, सुशीला हलमारे, दुर्गा तिराले, अखिलेश सेठ, सचीन शेंडे, सुनील भालेराव, हेमंत पंधरे, विजय रगडे, विनीत सहारे, नानू मुदलियार, मालती राजेश कापसे, वेनेश्वर पंचबुद्धे, जुनेद शेख, शंकरलाल टेम्भरे, राजेश जमरे, शिवलाल जमरे, सरला चिखलोंडे, नरेश कुंभारे, विजय बन्सोड, रुकीराम वाढई, शिवाजी गहाणे, टीकाराम मेंढे,

दानिश साखरे, जितेंद्र चौधरी, भगत ठाकरानी, लक्ष्मीकांत रोचवानी, विजय बिंझाडे, रिताताई पटले, प्रशांत दहाटे, जगदीश कटरे, नितीन लारोकर, सलीम जव्हेरी, राहुल गहेरवार, संदीप मेश्राम, ओमप्रकाश येरपुडे, नागेश तरारे, मनोहर तरारे, भोजराज धामेचा, विजय बुरांडे, प्रभू असाटी, सुनील पटले, शैलेश वासनिक सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता व पत्रकार बंधू उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें