चांद्रयान – 3 ची यशस्वी लँडिंग, वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल कौतुक!


  • चांद्रयान – 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर गोंदियात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोष… 

गोंदिया, दी. 23 ऑगस्ट : भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केलं. रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अपयशी ठरली. अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता. त्यानुसार ही मोहीम यशस्वी झाली आहे. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं.

भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण भारतासाठी नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडलं गेलं होतं. असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच सगळ्या वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं.

चांद्रयान – 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर गोंदियात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोष… 

चांद्रयान – 3 च यशस्वी लँडिंग थोड्या वेळापूर्वी झाली. याचा जल्लोष म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहरातील राष्ट्रवादी भवन येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. भारताचे अभिमान अंतराळात उंचविणारा चंद्रयान – 3 सुरक्षित रित्या लँडिंग झालं त्याच्या संपूर्ण देशवासीयांना अभिमान आहे अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिली.


 

Leave a Comment

और पढ़ें