पोलीसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई; 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 


  • मोहफुलाची दारू निर्मिती करणाऱ्या 5 आरोपी सह सट्टा पट्टी घेणाऱ्या एका ईसमावर पोलिसांची कारवाई 

गोंदिया, दि. 23 ऑगस्ट : पोलिस ठाणे तिरोडा अंतर्गत परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध धाड कारवाई ची विशेष मोहीम दिनांक : 22 ऑगस्ट रोजी राबविण्यात आली, अवैधरित्या हातभट्टी लावून हा.भ. दारू निर्मिती करणाऱ्या मोहफुलाची दारू गाळणाऱ्या एकूण 5 धंदेवाईक इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा 12 (अ) अन्वये एका इसमावर सट्टापट्टीची जुगार कारवाई करण्यात आली. यात आरोपी नामे

1) आशा राजेंद्र भोंडेकर राहणार संत रविदास वार्ड हिचे कडून 400 किलो मोहसळवा मोहाफुल रसायन किंमती 40 हजार रूपये.

2) अखिल रहीम खान पठाण राहणार संत रविदास वार्ड याचे कडून हातभट्टी चे साहित्य व सळवा मोहफुल रसायन असा एकूण 1 लाख 6 हजार 4 से 50 रूपये.

3) जयश्री सोविंदा बरेकर राहणार सिल्ली हिचेेकडून सडवा मोहफुल रसायन व हातभट्टी दारू असा एकूण 12 हजार 100 रूपये.

4)  गोपी भैयालाल कुंभरे राहणार काचेवाणी याचेकडून एकूण – 1 लाख 71 हजार 5 शे 50 रुपये किमतीचे हातभट्टीचे साहित्य व सळवा मोहफुल रसायन

5) किरण राजेंद्र भालाधरे राहणार आंबेडकर वार्ड, तिरोडा याचेकडून हातभट्टीचे साहित्य व मोहसळवा किंमत रुपये 2 लाख 60 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

6) नयन सुनील नागरिकर राहणार भूतनाथ वार्ड याचे सट्टापट्टीचे धंद्यावर रेड करून त्याचे ताब्यातून सट्टापट्टीचे साहित्य व सटापट्टी घेऊन मिळवलेले पैसे असे एकूण 805 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

धाड कारवाई मध्ये एकूण किमत 5 लाख 90 हजार 400 शे. रुपयांचा मुद्देमाल हातभट्टी दारू व सळवा मोहफुल रसायन व हातभट्टीचे साहित्य जप्त करून सळवा मोहफुल रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे. तसेच सट्टापट्टीचे कारवाई मध्ये एकूण 805 रुपये रोख व सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वरिष्ठांचे निर्देश आदेशाप्रमाणे सदरची धाड कारवाई पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे , सहायक पोलीस निरिक्षक अभिजित जोगदंड, यांचे नेतृत्वात महिला पोलिस फौजदार राधा लाटे, पो. हवा. बावणे, तिरपुडे, पो. शि. शिवराज शेंडे, अविनाश लोंढे, सौरभ देवगडे, डहारे, म. पो. शि. अभिलाषा वाल्दे यांनी केलेली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें