तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्व नियोजन बैठक संपन्न


सडक अर्जुनी, दि. 23 ऑगस्ट : आमदार जनसंपर्क कार्यालय एरिया 51 कोहमारा येथे सडक अर्जुनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांच्या अध्यक्ष्यते खाली, तालुका अध्यक्ष अविनाश काशिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीला देशाचे नेते, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २४ ऑगस्ट २०२३ गुरूवार दुपारी ०१ वाजता एन. एम. डी महाविद्यालय, गोंदिया येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजीत करण्यात आलेला आहे. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे, महिला तालुका अध्यक्ष रंनजनीताई गिऱ्हेपुंजे , पंचायत समिती सदस्य डॉ. रुखीराम वाढई, शिवाजी गहाणे, नगर सेवक आनंद अग्रवाल, चंद्रकुमार बहेकार, तालुका युवक अध्यक्ष राहुल यावलकर, शेखर चांदेवार, ओमराज दखणे, भागवत झिंगरे, दिलीप कापगते, अनिताताई बांबोडे, रेखाताई कोसरकर, पुष्मामालाताई बडोले, शिवांगीताई वाढवे, बडोलेजी
तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें