वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीला; आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते चार लक्ष रुपयाचे धनादेश वाटप.


सडक/अर्जुनी, दी. २१ ऑगस्ट २०२३ : तहसील कार्यालय स./अर्जुनी येथे नेसर्गिक आपत्ती वेवसस्थापन विभागा मार्फत मिळालेली रक्कम चार लक्ष रुपये एवढी आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सदर धनादेश मृतक ओमदास वाघाडे यांच्या कुटुंबाला आज देण्यात आले.

तालुक्यातील ग्राम घाटबोरी/तेली येथील शेतकरी ओमदास वाघाडे यांचा दी. २१ जुलै रोजी शेतात काम करीत असताना अंगावर नैसर्गीक विज पडून त्याचा मृत्यु झाला होता. त्या मुळे जिल्हा व तालुका आपत्ती वेवसस्थापण विभागाच्या वतीने मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून चार लक्ष रुपयाचे धनादेश मंजूर केले आहे. त्यांची पत्नी कांता बाई ओमदास वाघाडे यांच्या नावे चार लक्ष रुपयाचे धनादेश देण्यात आले.

त्या वेळी त्यांचे दोन्ही मुले उपस्थित होते. धनादेश वितरणा वेळी नायब तहसिलदार शरद हलमारे, तालुका रा.काँ.प. अध्यक्ष अविनाश काशिवार, प.स. सदस्य डॉ. रुखीराम वाढई, नगर सेवक राजु हेडाऊ, उमराव मांढरे, डॉ. दिलीप कापगते, राहुल यावलकर, नाजूक झिंगरे, भागवत झिंगरे, परसोडी/स. येथील तलाठी सांगोडे उपस्थीत होते.

आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी या कुटुंबीयांना भेट देऊन शासनामार्फत अनुदान मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले होते. आज २१ ऑगस्ट रोजी त्यांनी आश्वासन पूर्ण केली. हे दिसुन येते. आमदार चंद्रिकापुरे यांनी संजय गांधी, श्रावण बाळ, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा घेतला. या विभागात प्रलंबित असलेले प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढा असे आदेश करून लाभार्थ्यांना राज्य सरकार मार्फत मिळणारा मानधन लवकर मिळवून देऊ असे सांगितले.


 

Leave a Comment

और पढ़ें