मालगाडीच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू!


सडक अर्जुनी, दि. 20 ऑगस्ट 2023 : तालुक्यातील ग्राम सौंदड ते सिंदीपार परिसरातील रेल्वे मार्गावर एका व्यक्तीचा रेल्वेच्या ( मालगाडी च्या ) धडकेत अपघाती मृत्यु झाल्याची बातमी आज रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी समोर आली आहे. हा अपघात गोंदिया ते चंद्रपूर रेल्वे मार्गावर असलेल्या ग्राम सौंदड ते शिंदिपार परिसरात आज सकाळी 07 : 30 वाजता झाला.

अपघाताची माहिती मिळताच डूग्गीपार पोलिस घटना स्थळी दाखल झाले. अपघातात सदर वेक्ती जखमी अवस्थेत होता. त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रेल्वे पोलिसांनी दाखल केले असता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत व्यक्ती हा कोण आहे याची तपासणी केली असता. त्याची ओळख पटली नाही. तो अज्ञात ( अनओळखी ) आहे. त्या मुळे त्याचे मृतदेह दोन ते तीन दिवसा करीता. फ्रिझर मध्ये ठेवण्यासाठी डूग्गीपार पोलिसांनी देवरी येथील रुग्णालयात सोय केली आहे. अशी माहिती तपासिय अधिकारी आनंद दामले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें