लोहिया विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न


सौंदड, दी. 16 ऑगस्ट : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित आर-जे लोहिया विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथ. शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२३ ला विद्यालयात “स्वातंत्र्य दिनाचा” सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

ध्वजारोहक जगदीश लोहिया, संस्थापक-अध्यक्ष, लोहिया शिक्षण-संस्था, कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.ए. थेर, से. नि. गट शिक्षणाधिकारी, प्रमुख अतिथी आ. न. घाटबांधे, उपाध्यक्ष ,लो. शि. संस्था, शमिम अहमद सैय्यद यांनी भारत माता, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

त्याचबरोबर शाळेसमोरील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले त्यानंतर लगेच ध्वजारोहक जगदीश लोहिया यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने प्रभुदयाल लोहिया, अध्यक्ष वि.का. से.स. संस्था सौंदड, प्रल्हाद कोरे, रामचंद्र भेंडारकर, नलिराम चांदेवार,  गजानन कापगते, पुरुषोत्तम लांजेवार, महादेव लाडे, भजनदास बडोले,  दिलीप शहारे, आत्माराम कापगते, रामकुमार चांदेवार, वसंता विठ्ठले, मनोहर इरले , प्राचार्य मधुसूदन अग्रवाल,  गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी.एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल उपस्थित होते.

ध्वजारोहण नंतर वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल कक्षाचे उद्घाटन थेर सर से. नी. गटशिक्षणाधिकारी यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने ध्वजारोहक जगदीश लोहिया, संस्थापक अध्यक्ष, लो. शिक्षण-संस्था व अतिथी उपस्थित होते.

ध्वजारोहक मा – जगदीश लोहिया, संस्थापक-अध्यक्ष, लोहिया शिक्षण-संस्था, कार्यक्रमाचे अध्यक्ष सी. ए. थेर, से. नि. गट शिक्षणाधिकारी यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व ,”माझी माती माझा देश” ही संकल्पना पटवून देत विद्यार्थांना मार्गदर्शन केले व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य गण, पालक, गावकरी तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कू. यू. बी. डोये , स. शि. यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मनोज शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता “जय जय महाराष्ट्र माझा…….”या महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आली.


 

Leave a Comment

और पढ़ें