सौंदड येथे विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम संपन्न.


सौंदड, दि. 16 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिन नीमित्त आज 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात ध्वजारोहनाचे कार्यक्रम संपन्न झाले. त्याच अनुसंघाने तालुक्यातील ग्राम सौंदड येथे सुध्दा विविध ठिकाणी ध्वजारोहनाचे कार्यक्रम संपन्न झाले.



सर्व प्रथम ग्राम पंचायत सौंदड येथे सरपंच हर्ष मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद हायस्कूल, जिल्हा परिषद नागरी शाळा 1 व 2 येथे सुधा ध्वजारोहनाचे कार्यक्रम संपन्न झाले. त्या त्या ठिकाणी तेथील पदाधिकारी यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात शाळकरी विद्यार्थी व शिक्षकांनी एका रांगेत प्रभात फेरी वादकाच्या तालावर काढली. यावेळी सपथ विधी घेण्यात आली. गावात मोठे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम् च्या गजरात सौंदड गाव दुमदुमले होते.

ग्राम पंचायत प्रशासनाने माजी सैनिक, ग्राम पंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सत्कार केले. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमीत्ताने “माझी माती माझा देश” या उप क्रमांतर्गत गावात उभारलेल्या फलकाचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून मल्याअर्पण करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने सरपंच हर्ष मोदी सह उपसरपंच भाऊराव यावलकर, ग्राम विकास अधिकारी जे. एस. नागलवाडे, पंचायत समिति सदस्य वर्षा सहारे, ग्राम पंचायत सदस्य प्रमिला निर्वाण, कुंदा साखरे, शुभम जनबंधु, रंजना भोई, खुशाल ब्राह्मणकर, अर्चना चन्ने, विजय चोपकर, योगेश्वरी निर्वाण, अर्चना डोंगरवार, रेखा राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष चरणदास शहारे, व्यापारी समिति चे अध्यक्ष संदीप मोदी, मंगेश मोदी, संपादक : बबलू मारवाडे, ज्येष्ठ नागरिक आनंदराव घाटबांधे, पुरुषोत्तम निंबेकर, माजी प्राचार्य के. डी. रहिले, तुलाराम चांदेवार, अंजू इरले, माजी पंचायत समिती सदस्य मंजू डोंगरवार, ग्यानीराम किरणापुरे, पवन चुटे, रोशनी सारंगपुरे, संगीता राऊत, ओमकार टेंभुर्णे, उषा राऊत, शिवा शिरसागर, हिमांशू राऊत, दामोदर नेवारे, कमल किशोर चुरहे, शशिकांत काले, दिनेश भेंडारकर, सुनील डोये, आशीष राऊत, राजू वैश्य, सेवा निवृत्त सैनिक, सफाई कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, ग्राम पंचायत कर्मचारी, आशा सेविका, आंगनवाड़ी सेविका आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें