आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण


  • विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : आमदार मनोहर चंद्रिकापुरे

सडक अर्जुनी, दि. १४ ऑगस्ट : राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागात मुलभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली गावांतर्गत रस्ते, सभामंडप व अन्य मुलभूत नागरी सुविधांकरिता आमदार स्थानिक विकास निधी, २५१५, मातोश्री पांदन योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी रविवारी सांगितले.

सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत खडकी येथे गावातील विविध कामे सुमारे १ कोटी ३४ लक्ष किमतीच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचे आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

आमदार स्थानिक निधी अंतर्गत भुमिपुजन झालेले विकास कामे… लहानु तुमळाम ते आश्राम शाळा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम रक्कम १० लक्ष रुपये., विठ्ठल रखुमाई मंदीर डोंगरगांव जवळ सभामंडप बांधकाम रक्कम ७ लक्ष रुपये.

लोकार्पण झालेले विकास कामे… मौजा खडकी येथे आमदार स्थानिक निधी अंतर्गत सदाशिव विठोले ते उदाराम विठ्ठोले सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजीत रक्कम १० लक्ष रुपये., मौजा खडकी येथ नवबौध्द घटक योजनेअंतर्गत बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फेविगं ब्लॉक बसवणे अंदाजीत रक्कम १० लक्ष रुपये., मौजा खडकी येथे प्रकाश तागडे ते मंगला वैद्ये यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम अंदाजीत रक्कम ७ लक्ष रुपये, मौजा डोंगरगांव येथे २५/१५ योजने अंतर्गत NH6 ते संदीप कवाडकर सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजीत रक्कम ७ लक्ष रुपये, मौजा खुर्शीपार येथे २५/१५ योजने अंतर्गत अंदाजीत रक्कम ३ लक्ष रुपये, हनुमान मंदीराजवळ सभागृह बांधकाम 7 लक्ष रुपये, मौजा खुर्शीपार २५/१५ योजने अंतर्गत माता मंदीराजवळ सभागृह बांधकाम अंदाजीत रक्कम ५ लक्ष रुपये, मौजा खडकी व खडकीटोला येथे मातोश्री पांदन रस्ता खडीकरण योजने अंतर्गत रस्ताचे खडीकरण ७५ लक्ष रुपये या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रंसगी दिपालीताई मेश्राम पं. स. सदस्य सडक/अर्जुनी, शर्मिलाताई चिमणकर ग्रा.पं. सरपंच खडकी, सिंधुताई बारसागडे माजी सरपंच खडकी, मालतीताई वट्टी उपसरपंच खडकी, कृष्णा ठलाल माजी उपसरपंच खडकी, एम.जे. पदा ग्रामसेवक खडकी, ओमराज दखणे, पुरुषोत्तमजी मेश्राम, घनश्यामजी सलामे, सुभाषजी कुळमते, सिमाताई ब्राम्हणकर, प्रमिलाताई कुसराम, कौतुकाबाई कुंभरे, छायाताई कुलभजे, विनोद अग्रवाल पो.पा. डोंगरगांव, खेमराजजी देशमुख पो. पा. खुर्शीपार, गिरीधारी मरस्कोल्हे पो. पो. खडकी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितित कार्यक्रम संपन्न झाला.

विकासाची प्रक्रिया गतीमान होणार  : आ. मनोहर चंद्रिकापुरे

ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्मितीसह अनेक मुलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ती गुणवत्तापूर्ण असावीत. चांगले रस्ते निर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. इतरही आवश्यक रस्ते सुधारणेच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव द्यावेत.

विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली. पावसाळ्यात साथरोगांचा फैलाव होत असल्याने रोगांना आळा घालण्यासाठी त्यादृष्टीने पिण्याच्या पाण्याच्या टाकींची स्वच्छता, आरोग्यकेंद्रात पुरेसा औषधींचा साठा व अंगणवाडीत बालकांसाठी पोषण आहार आदी महत्वपूर्ण बाबी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.


 

Leave a Comment

और पढ़ें