खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत मोहाडी, तुमसर येथे तिरंगा बाईक रॅली


भंडारा, दि. 14 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत आहे. सांगता समारोहा निमित्त विविध उपक्रम देशभर राबविली जात आहेत. अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात करताना घरा घरावर लागलेली तिरंगी, प्रत्येक देशवासीयाचा दिसून आलेला उदंड प्रतिसाद, अजूनही मनात घर करून आहे. या अमृत महोत्सवाची सांगताही तेवढ्याच दिमाखात व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे मोहाडी आणि तुमसर येथे तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

यावेळी खासदार सुनील मेंढे, डॉ. परिनय फुके, सह प्रकाश बाळबुद्धे, प्रदीप पडोळे, भगवान चांदेवार पंकज बालपांडे, काशिराम टेभरे, संतोष वाहिले, राजा लांजेवार, सचिन बोपचे, पवन पाटील, शुभम मिश्रा, आशिष भुरे, गीताताई कोढेवार, शोभाताई लांजेवार, कल्याणीताई भुरे, अर्चनाताई भुरे, कुंदाताई वैद्य, प्रियंकाताई कटरे, पालवीताई पाटील, मनीषाताई उपादय तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें