ग्राम सौंदड येथे सरपंच हर्ष मोदी यांनी घेतली बाल सभा


सौंदड, 05 ऑगस्ट 2023 : ग्राम पंचायत सौंदड येथील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक तसेच सौंदड येथील वस्तीत असणारी नागरिक शाळा येथे ग्राम पंचायत सौंदडचे सरपंच हर्ष विनोद्कुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात हर्ष विनोद्कुमार मोदी यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि शालेय समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व विद्यार्थ्यांना एक मोलाचा संदेश दिला. शाळेत घडणाऱ्या काही गोष्टी किंवा आयुष्यात होत असणारे बदल याबद्दल आपल्या आई-वडिलांशी चर्चा करावी यामुळे जीवनातील अनेक समस्या मार्गी लागतात.

एका चुकीचा निर्णयामुळे विद्यार्थी जीवनात अनेक वाईट बदल घडून त्याचा पुढील जीवनावर गंभीर परिणाम पडून आयुष्य उध्वस्त होण्याचा मार्गावर लागतो. त्यापेक्षा अश्या जटिल विषयासंबंधी सर्वात जवळ आपली आई आणि वडील असल्याने त्यांच्या मार्गदर्शनात निर्णय घेतल्यास आयुष्यात खूप पुढे जाऊन यश संपादित करता येतो, असे मार्गदर्शन हर्ष मोदी यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवून गप्पागोष्टी केल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या शिवाय शालेत मिळणारे शालेय पोषण आहार बाबत सुद्धा मोका चौकशी केली. जेवणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत योग्य दखल घेण्याचे शालेय प्रशासनाला मार्गदर्शन केले. ग्राम पंचायतीच्या माध्यमाने संपूर्ण सहकार्य करण्याची सुद्धा ग्वाही हर्ष मोदी यांनी दिली.

शालेय समस्यांचे निराकरण लवकरच केले जाईल आणि जिल्हा परिषद आणि शासनाकडे मांडून तात्काळ मार्गी काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जाईल अशी हमी दिली. यावेळी सरपंच हर्ष मोदी यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य शुभम जनबंधू, पुरुषोत्तम निंबेकर, वृषभ राऊत, आशिष राऊत, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग आणि गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें