शिंदिपार – तेलीघाटबोरी मार्गाने रेतीची वाहतूक सुरू


  • बेल बंडी धारकांच्या माध्यमातून रेतीची अवैध वाहतूक जोमात! कारवाई कधी होणार

सडक अर्जुनी, दी. 01 ऑगस्ट : सध्या पावसाळा सुरू आहे. नदी व नाल्यात पाणी भरले आहे. असे असले तरी तालुक्यात अनेक ठिकाणी बांधकाम चालु आहेत. या बांधकामांना वाळूचा पुरवठा कुठून होतो हा संशोधनाचा विषय आहे. नदी पात्रात आता पाणी असल्याने आत ट्रक्टर जाऊ शकत नाही. असे असले तरी वाळू येते कुठून हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तालुक्यात पावसा पूर्वी अनेक ठिकाणी अवैध रेती वेवसायकांनी रेतीची डंपिंग केली आहे. ती वाळू उचलून वाळूची वाहतूक आवश्यक ग्राहकाला केली जाते. तालुका प्रशासनाने या डंप रेतीवर कारवाई करायला पाहिजे होती मात्र तसे झाले नाही.

आता नदी पात्रातून बेल बंडी च्या साह्याने वाळू बाहेर काढली जाते. ती वाळू वाहन धारकांना विक्री केली जाते. पावसाळ्यात वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. एक ब्रास वाळू ची किंमत आता अडीच ते तीन हजार रुपये एवढी वाढली असून तालुक्या बाहेर दोन ब्रास वाळूच्या ट्रॅक ची किंमत आठ ते नव हजार रुपये एवढी प्रचंड वाढली असून त्याला मागणी सुधा वाढली आहे.

अश्यात तालुका प्रशासन अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. तालुक्यातील सौंदड, राका, पळसगा, पिपरी, फुटाळा, शिंदिपार, तेलीघाटबोरी या मार्गाने वाळूची वाहतूक चालू असते.

प्रशासन जनतेला सहासे रुपयात वाळू ऊपलब्ध करून देणार होते. मात्र तालुक्यातील एकाही वाळू माफियाने यात सहभाग घेतला नाही. कारण या कामात चोरीचे मार्ग सापडत नसल्याने मफियांनी आदीच हात वर केले. जे काम फुकटात होते त्याला पैसे का मोजायचे असा सवाल काही कथित माफियांना चर्चे दरम्यान उपस्थित केला. अधिकारि आपलेच आहेत. त्या मुळे घाबरण्याची गरज नाही. त्या मुळे तालुक्यातील कायदा सुवेवस्था डगमगीला आली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें