गोंदिया जिल्ह्यातील “बोगस” 3 हजार 207 रेशन कार्ड रद्द करण्यात आले


गोंदिया, दि. 09 जुलै : जिल्ह्यात काही रेशन कार्डधारकांनी डुप्लिकेट रेशन कार्ड बनवले आहे. अशा रेशन कार्डाची पुरवठा विभागाने छाननी करून या शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. दुसऱ्या राज्यातून काही दिवस रोजगाराच्या शोधात आलेले नागरिक महाराष्ट्रातही रेशन कार्ड बनवितात.

सदर कुटुंब मूळच्या राज्यात व महाराष्ट्रातही रेशनचा लाभ उचलत होते. केंद्र शासनाने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजना सुरू केली. या अंतर्गत देशात कुठेही वास्तव्यास असला तरी संबंधित रेशनकार्डधारकाला धान्याचा लाभ देता येते.

त्यामुळे दोन रेशन कार्डाची गरज उरली नाही. तसेच दोन रेशन कार्डच्या माध्यमातून दोन ठिकाणी धान्याची उचल केली जात होती. ही बाब लक्षात आल्यानंतर कार्ड रद्द केले. ही प्रक्रिया यापुढेही चालूच राहणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 3 हजार 207 रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें