बंगाली बांधवांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन


अर्जुनी मोर, दि. 01 जुलै : गोंदिया जिल्हातील पुनर्वसित बंगाली समाजातील नमोशूद्र, पौड्रो, क्षत्रिय, राजवंसी या जातीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या माध्यमातून बंगाली बांधवांच्या समस्या निवारण करण्यासाठी राजकुमार बडोले माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात 30 जुन रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

प्रसंगी प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी चे प्रकल्प व्यवस्थापक प्रेमकुमार हनुवते, निखिल भारतीय बंगाली समाज समन्वय महाराष्ट्र प्रदेश सचिव विधान बेपारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी तथा सर्वेक्षण समिती सहकारी, डॉ. कमलेश गाईन नि. भा. ब. स. संघटन सचिव महाराष्ट्र राज्य, निखिल भारतीय बंगाली समाज समन्वय समिती गडचिरोली कार्यकारी अध्यक्ष समीर अधिकारी, रामदास कोहाडकर माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रकाश गहाने माजी सभापती जि. प. राजहंस ढोके, संतोश मीर्धा सरपंच दिनकरनगर, खोकन सरदार माजी सरपंच दिनकरनगर जतिन मंडल, वणमाली मंडल, रजनी सरकार आदी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित होते.

बंगाली समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाण पत्र देण्यासाठी राजकुमार बडोले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री असताना त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहीती प्रा. बिधान बेपारी यांनी दिली. प्रेमकुमार हनवते यांनी बंगाली समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यासाठी बार्टी द्वारा सामाजिक न्याय मंत्री असतांना सादर केलेल्या प्रस्तावाबाबद माहिती दिली.

यावेळी बंगाली समाजाने व नमोशुद्र समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत जाण्यासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव कार्य करण्याचे व त्यांचे प्रापर्टी कार्ड देणेबाबत व वर्ग दोन ची जमीन वर्ग एक करणेबाबत आपण त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटीबद्द असल्याचे सांगितले.


 

Leave a Comment

और पढ़ें