दारुड्या वाहन चालकाच्या हलगर्जी पणामुळे ट्रकला भीषण आग!  लाखोंचा मुद्देमाल जळून खाक


  • अशोका टोल प्लाझा कडे फायर फायटर चे वाहन नाही, कोट्यावधी रुपयांची टोल च्या माध्यमातून रोज वसुली केली जाते. मात्र सोई सुविधांचा अभाव आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सौंदड, दी. 30 जुन : दारुड्या वाहन चालकाच्या हलगर्जी पणामुळे आज एका ट्रक ला भीषण आग लागली आहे. या घटनेत लाखोंचा मुद्देमाल जळाला आहे. घटना सौंदड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील मामा तलाव परिसरातील आहे. आज 30 जुन रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका ट्रॅक ला भीषण आग लागली त्या मुळे ट्रॅक चे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाले आहे.



काही प्रतेक्ष दर्शी नागरिकांनी सांगितले की सदर वाहनाचे टायर सौंदड येथील रेल्वे मार्गाच्या पलीकडे फुटले होते. तरी देखील अवजड वाहन – वाहन धारकाने तब्बल एक किमी अंतर चालवत नेले अश्यात फुटलेल्या टायर मध्ये आग लागली. ही आग काही वेळानंतर विक्राल झाली त्या मुळे वाहनाचे मागील सर्व टायर जळून खाक झाले.

डूग्गीपार पोलिस घटना स्थळी दाखल झाले. आग विजविण्यासाठी साकोली आणि सडक अर्जुनी येथील नगर परिषद चे अग्नी शमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण करण्यात यश आले.

सदर वाहनात लोखंडी स्केर पाईप भरले होते. त्या मुळे आग आटोक्यात आली. तरी देखील वाहनाचा मागील भाग संपूर्ण जळून नष्ट झाले आहे. वाहन क्रमांक : सी.जी. ०४ एच.डब्लू. ४२०७ असे असून वाहन चालक कृष्णा ताते असे सांगितले आहे. सदर वाहन एच.आर.सी कंपनीचा असून रायपूर वरून सुरतला लोखंडी पाईप घेऊन जात होते.

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग सौंदड येथे वाहनाला आग लागली. वाहन चालकाशी पत्रकारांनी चर्चा केली असता वाहन चालक दारूच्या नशेत टल्ली अवस्थेत होता. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. डूग्गीपार पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

  • अशोका टोल प्लाझा कडे फायर ब्रिगेड (फायटर) चे वाहन नाही. 

नागपुर ते रायपूर मार्गावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील अशोका टोल प्लाझा यांच्याकडे आग विजविण्यसाठी फायर फायटर मशीन नाही. त्या मुळे महामार्गावर जळालेले वाहन तात्काळ विजविता येत नाही. टोल प्लाझा यांनी महामार्गावर चालणाऱ्या वाहनांना सेवा देणे आवश्यक आहे. कोट्यावधी रुपयांची दिवसाला वाहन धरकांकडून टोल च्या माध्यमातून वसुली केली जाते. तरी देखील वाहनधारकांना पाहिजे त्या सुविधा मिळत नाही. आग विजविण्यासाठी चक्क नगर परिषद चे फायर ब्रिगेड बोलावे लागतात तर त्याचे पेमेंट देखील वाहन धारकांनाच द्यावे लागतात. त्या मुळे वाहन धारकात देखील नाराजीचा सूर आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

अशोका टोल प्लाझा मॅनेजर, संजय राय :

आमच्याकडे करारानुसार सर्व साहित्य उपलब्ध आहेत. मात्र आग विजविण्याठी फायर फायटर वाहन नाही. त्या ठिकाणी टेंकर आहे. ज्यांनी फायर फायटर ची गाडी बाहेरून आग विजविनीसाठी बोलावली आहे. त्यांना त्याचे पेमेंट करावे लागेल. आमच्या टीम ला माहीत झाले असते. तर घटना स्थळी आग विजविन्यसाठी टेंकर आली असती.


 

Leave a Comment

और पढ़ें