नाशिक, दिनांक : ०४ जून २०२३ : बडतर्फ मुख्याध्यापकाकडून 50 हजारांची लाच घेतांना महापालिकेत ०२ जून रोजी शुक्रवारी सायंकाळी धनगरांना त्यांच्याच कॅबिनमधून रंगेहाथ अटक करण्यात आले. नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्या उंटवाडी परिसरातील घरातून एसीबीच्या हाती मोठं घबाड लागलं असून एक दोन लाख नाही तर तब्बल 85 लाख रोख रक्कम आणि 32 तोळे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात त्यांच्या नावावर दोन आलिशान फ्लॅट आणि एक जागा देखील आहे. त्या सध्या वास्तव्यास असलेल्या उंटवाडी परिसरातील राहत्या फ्लॅटचीच किंमत जवळपास दिड कोटी रुपये एवढी आहे. 85 लाख रुपये मोजताना एसीबीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. अखेर मशीनच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली आणि यात सुदैवाने दोन हजाराची एकही नोट सापडली नाही.
दरम्यान या कारवाई संदर्भात एसीबी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर म्हणाल्या की, मध्यरात्री जवळपास 8 तास एसीबीचे पथक त्यांच्या घरात तळ ठोकून होते. सुरुवातीला एसीबी घर शोधत असतांना घर बंद असल्याने पथकाने घर सील केले आणि त्यानंतर त्यांचे कुटुंबीय येताच घर उघडण्यात आले होते. धनगर यांचे बँक खाते, लॉकर्स किती? याबाबत सध्या तपास सुरू असून आणखी किती माया त्यांनी जमा केली आहे? याकडेच सगळ्यांचच लक्ष लागल आहे.
सेवेत रुजू करून घेण्यास नकार देणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेवर कारवाई करण्याच्या मोबदल्यात बडतर्फ मुख्याध्यापकाकडून 50 हजारांची लाच घेतांना महापालिकेत शुक्रवारी सायंकाळी धनगरांना त्यांच्याच कॅबिनमधून रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एका लिपिकानेही तक्रारदाराला पत्र बनवून देण्यासाठी 5 हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले होते. ही कार्यवाई नाशिक एसीबी ने केली आहे.