जिल्हा परिषद हायस्कूल सौन्दडचे सुयश


सौन्दड, दिनांक : ०४ जून : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलने गतवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा वर्ग १० वीच्या परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील ५० विद्यार्थ्यांपैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९८ टक्के आहे. निकालात प्रणय चुटे ९० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. मोहित गायधने ८५. ४० टक्के मिळवीत द्वितीय तर तुषार किरणापुरे याने ८४.६० टक्के गुण घेऊन तृतीय स्थान पटकावले. इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये खुशबू रहेले ८४ टक्के, हिमानी मदनकर ८३.४० टक्के, आकृती जनबंधू  ८३ टक्के व रितिक टेंभूर्णे ८३ टक्के यांचा समावेश आहे.

गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. भीमटे शिक्षक अनिल बोरकर, अनिल कापगते, जयपाल मोटघरे, लोकेश रहांगडाले, स्वदीप रामटेके, दमयंती तुरकर, प्रीती टेम्भुर्णीकर, प्रतिभा बाकडे, मोहन कोहळे यांना दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य निशाताई तोडासे/जनबंधू ,पं. स. सदस्य वर्षाताई शहारे, सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच भाऊराव यावलकर, केंद्र प्रमुख के. आर. वासनिक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक पालक तथा माता पालक समिती सदस्य यांनी कौतुक केले.


 

Leave a Comment

और पढ़ें