प्रेम विवाह भंगले; पत्नी पाठोपाठ पतीची रेल्वे मार्गावर आत्महत्या!


  • तीन दिवसा पूर्वीच पत्नीने केली आत्महत्या… हत्या की आत्महत्या नागरिकात सभ्रम! 

सडक अर्जुनी, दिंनाक : 02 जून 2023 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे आज एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जोडप्याचे नुकतेच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाले. मात्र हे प्रेम विवाह अल्पसा कालावधी नंतर भंगले. पत्नी पाठोपाठ पतीने सुध्दा रेल्वे मार्गावर येत आत्महत्या! केली. या मुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. असे कोणते प्रकरण घडले ज्या मुळे दोन्ही जीवाला आपले संसार सोडून टोकाचे पाऊल उचलावे लागले. पत्नीची राख ईकडे थंड होत नाही तो पतीने देखील आत्महत्या केली आहे.

हे ही वाचा : गोंदिया – चंद्रपूर रेल्वे मार्गावर १९ वर्षीय महिला अपघातात ठार!

डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक नामे : दिगंबर श्रावण भुसारी वय 24 वर्ष मुक्काम सौंदड असे आहे. आज दी. 02 जुन रोजी दुपारी 05 : 30 वाजता दरम्यान चंद्रपूर वरून गोंदिया कडे जाणारी रेल्वे गाडी चांदाफोर्ट ते जबलपुर असे असून गाडी नंबर : 22173 च्या धडकेत दिगंबर श्रावण भुसारी यांचा मृत्यू झाला. गावाबाहेर शेत शिवार लगत रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह अस्त वेस्त स्थित मिळाला. ही घटना माहीत होताच लोकांची अलोट गर्दी जमली होती.

त्याची पत्नी सौ. डीकेस्वरी दिगंबर भुसारी वय 19 वर्ष या महिलेने 31 मे रोजी दुपारी 02 : 49 वाजता याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती. पत्नी नंतर आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली. घटना स्थळी पोलिस उपस्थित झाले. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे शववीच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे. उद्या म्हणजे 03 जुन रोजी नातेवाईकांना मृतदेह स्वाधिन केले जाईल.

एकनाथ श्रावण भुसारी यांच्या तक्रारीवरून डूगगीपार पोलिस स्थानक येथे मर्ग क्रमांक : 30/2023 कलम 174 सीआरपिसी अंतर्गत नोंद करण्यात आला आहे. ठाणेदार रेवचंद सिंगंजुडे यांच्या मार्गदर्शनात घटनेचा तपास पोलीस हवालदार आनंद दामले, पोलिस नायक संजय चकोले, पोलिस शिपाई महेश धूर्वे करीत आहेत. दोन्ही पती पत्नी च्या आत्महत्या मागे कुणाचा हात तर नाही ना. याचा कसून तपास डूग्गीपार पोलिस करीत आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें