- संग्रहित छायाचित्र
सौंदड : दिनांक : ३१ मे २०२३ : डूग्गीपार पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह गोंदिया – चंद्रपूर रेल्वे मार्गावर सौंदड शेत शिवार परिसरात मिळाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी ०२ : ४९ वाजताची आहे. डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रपूर वरून गोंदिया कडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत सदर महिलेचा अपघात झाला. त्यात महिला जागीच ठार झाल्या. मृतदेह रेल्वे ट्रॅक वर मिळाला.
रेल्वे विभागाचे कर्मचारी मनोज पटेल यांनी सदर घटनेची माहिती डूग्गीपार पोलिसाना भ्रमण ध्वनी वरून दिली. त्या माहिती नुसार पोलिसांनी सदर घटना स्थळ गाटलेे. मृतदेह पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. प्रथम दर्शनी सदर मृतदेह कुणाचा आहे. याची कुणालाही ओळख पटली नाही.
समोर पोलिसांनी तपास केल्याने तपासा दरम्यान मृतदेहाची ओळख समोर आली. सदर महिला सौंदड येथील असून मृतक सौ. डीकेस्वरी दिगंबर भुसारी वय १९ असे आहे. सदर महिलेचा नुकताच काही महिन्या पूर्वी लग्न झालं होत. ही हत्या आहे की आत्महत्या या बाबद कुठलीही माहिती समोर आली नाही. डूग्गिपार पोलिस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे. २८/२०२३ कलम १७४ नुसार मर्ग दाखल करण्यात आला आहे.
डूग्गीपार चे ठाणेदार रेवचंद शिंगंजुडे यांच्या मार्गदर्शनात घटनेचा तपास सहाय्यक फौजदार वेंकट नागपुरे, रायटर महेंद्र सोनवाणे आणि उदयभान रुखमोडे करीत आहेत. ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केले आहे.
