सडक अर्जुनी, दिनांक : २३ मे २०२३ : मौज रेन्गेपार / पांढरी येथील शेतकरी शालीकराम राकडू धासले यांच्या शेतातील तनसिच्या ढिगार्यात अवैध रित्या लाकडे लपून ठेवले आहे. अशी गुप्त माहिती तालुका वन विभागाच्या अधिकार्यांना १९ मे रोजी मिळाली. त्या गुप्त माहितीच्या आधारावर पाहणी केली असता. तनसिच्या ढिगार्यातून लाकडे कुणीतरी लंपास केल्याचे दिसून आले. या बाबद वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी शालीकराम राकडू धासले यांना विचारणा केली असता.
शेतकर्याने केलास रवींद्र घासले मुक्काम रेन्गेपार यास घटना स्थळी बोलावले. लाकूड बाबाद विचारणा केली असता. त्याने नागझिरा जंगलातून बिजा जातीचे झाडे तोडून लाकडे तनसिच्या ढिगात आणून ठेवली होते. नंतर शेता लगत च्या जंगलात नेऊन ठेवले असे सांगितले. यामध्ये दिलीप उईके, अविनास पंधरे मु. रेन्गेपार सोबत अश्ल्याचे सांगितले. जंगलात मिळून आलेल्या लाकडांचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप केले. सदर लाकूड हा बिजा जातीचा आहे. एकूण ५ नग असून ०.४१८ घनमीटर इतके आहे. त्याची किंमत १३०४८ रुपये इतकी आहे. अवैध रित्या लाकूड कापणारा व मदत करणाऱ्या आरोपी विरोधात वन गुन्हा नोंद करून लाकडे वन विभागाकडे जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई वन क्षेत्र सहाय्यक युवराज राठोड, वन क्षेत्र सहाय्यक गजानन सय्याम, व बीट गार्ड यांनी केली आहे.