ACB : घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मागितली लाच; ग्रामसेवक अटक


परभणी, दी. 16 मे 2023 : लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 15 मे रोजी 7 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. परभणी जिल्हयातील जिंतूर तालुक्यातील केहाळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ज्ञानेश्वर उत्तम राठोड 29 असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्यांच्या विरूध्द जिंतूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारच्या वडिलांचे नावाने शासनाच्या अदिवासी समाजासाठी असलेल्या शबरी घरकुल योजने अंतर्गत घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तसेच नमुना नंबर 8 चा उतारा काढण्यासाठी ग्रामसवेक ज्ञानेश्वर उत्तम राठोड यांनी तक्रारदारास दि. 28 एप्रिल 2023 रोजी 7 हजार रूपयाची लाच मागितली होती. दि. 15 मे 2023 रोजी सरकारी पंचासमक्ष ज्ञानेश्वर राठोड यांनी तक्रारदाराकडून पंचायत समिती समोरील अमृत ज्यूस अॅन्ड नास्ता सेंटर जिंतूर येथे लाच घेतली.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे पोलिस हवालदार चंद्रशेखर निलपत्रेवार, पोलिस मिलिंद हनुमंते, पोलिस अतुल कदम, पोलिस शेख मुख्तार, पोलिस शेख झिब्राईल, पोलिस जनार्दन कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें