“नाचता येईना अंगण वाकडं” नाना पटोले यांचा अजित पवारांना खोचक टोला


नवी दिल्ली, 12 मे 2023 :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्ही गोष्टी पूर्ववत करू शकत नसल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भूमिका मांडली. लोकमत न्यूज 18 ने दिलेल्या माहितनुसार महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत आणि ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत चूक झाल्याचं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या या वक्तव्यावरून नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. ‘आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा दिला, तो राजीनामा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला गेला.

राजीनामा दिल्यानंतरच त्याबाबत सांगण्यात आलं. राजीनामा नको द्यायला पाहिजे होता, पण तो दिला. तो राजीनामा मंजूर झाल्यानंतर लगेचच अध्यक्षाची निवड लाऊन तो विषय संपवायला पाहिजे होता’, असं अजित पवार म्हणाले. नाना पटोलेंचं प्रत्युत्तर ‘त्यांनी स्वत:च प्रश्न विचारला आणि स्वत:च उत्तर दिलं की एक वर्ष आम्ही अध्यक्षाची निवड न करून चूक केली.

त्यांचा उपाध्यक्ष होता, त्यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांच्याकडे अध्यक्षाचे अधिकार होते, या अधिकारांचा वापर त्यांनी का केला नाही? याचं उत्तर अजित पवार का देत नाहीत. जर-तरच्या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही’, असं नाना पटोले म्हणाले. ‘अजितदादा सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीयेत.

त्यांचा उपाध्यक्ष होता, ज्या पॉवर मी वापरू शकत होतो, त्यांचा उपाध्यक्षही वापरू शकत होता. आता त्यांचा उपाध्यक्षही बोलायला लागला आहे, आतापर्यंत ते बोलत नव्हते. ते आता मीही 16 जणांना अपात्र करू शकतो, असं बोलू लागले आहेत. त्यांच्या उपाध्यक्षांना अधिकार असताना त्यांनी का वापरला नाही, याचं उत्तर का देत नाही?

नाचता येईना अंगण वाकडं, या म्हणीत जाऊ नये’, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. ‘अध्यक्षपदाची निवड व्हावी, अशी मागणी आम्ही प्रत्येक अधिवेशनात करायचो. एकेदिवशी तर आम्ही रात्री 4 पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बसलो होतो. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष करायचा हे ठरलं, आणि सकाळी सांगितलं आता नाही केलं पाहिजे’, असा गौप्यस्फोटही नाना पटोले यांनी केला.


 

Leave a Comment

और पढ़ें