नवेगाव बांध : दिनांक : ०६ मे २०२३ : यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्राम विकासाचा हा संकल्प पूर्ण होत आहे. जल जीवन मिशन हे सुध्दा अशाच कल्याणकारी योजनांचा भाग असून घरा घरात मुबलक आणि शुद्ध पाणी पोहचणार असल्याचे मत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी वेक्त केले. ते आज ०६ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे जल जीवन मिशन अंतर्गत कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले केंद्र सरकार ग्राम विकासाचे सूत्र हाती घेत पुढे जात आहे. जे काही चांगले आणि कल्याणकारी उपक्रम, योजना राबवित केंद्र सरकार सामन्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे, ते कार्य जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरणारे आहे. लोकांनीही या लोकहिताच्या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रत्येकाला घर, घरात गॅस आणि आता प्यायला शुद्ध पाणी ही निर्धार पूर्णत्वास जात असल्याचा आनंद असल्याचेही यावेळी सांगितले.
ग्राम नवेगाव बांध येथे जल जीवन मिशन अंतर्गत 4 कोटी 97 लाख 44 हजार रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजना व सिरेगावबांध येथील 3 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांच्या पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती कामाचे भूमिपूजन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मनोहर चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, रचना गहाणे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य, हिराताई पंढरी सरपंच नवेगाव, रमेश डोंगरवार उपसरपंच नवेगाव बांध, संदीप कापगते पंचायत समिती सदस्य, देवा कापगते ग्रामपंचायत सदस्य, पितांबर काशीवार ग्रामपंचायत सदस्य, दुर्गाताई शहारे ग्रामपंचायत सदस्य, सोनाली नाकाडे ग्रामपंचायत सदस्य, सुप्रिया सांगोडकर ग्रामपंचायत सदस्य, पल्लवी मुंडे ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.