अविनाश ब्राह्मणकर यांच्या कमळ या चिन्हाचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. : खा. प्रफुल पटेल 

साकोली, भंडारा, दि. 13 नोव्हेंबर : या भागात धान उत्पादक शेतकरी असून क्षेत्रातील शेतीला सिंचन करण्याचे स्वप्नं आहे ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्हयात गोसे/खुर्द, इटियाडोह, चुलबंध सारख्या प्रकल्पामुळे सिंचन होत आहे. याभागात भविष्यात धापेवाडा टप्पा ३ मध्ये लाखनी व साकोली पर्यंत पाणी आणून शिवणी, नवेगावबांध व इतर या परिसरातील लहान मोठ्या जलाशयात सोडण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. विकास कामे करतांना कार्यक्षम नेतृत्व असेल तरच कामे होतात अविनाश ब्राह्मणकर यांना माझा साथ आहे आणि मी खात्री देतो सिंचन, रोजगार यासाठी कटिबध्द आहे.

आज 12 नोव्हेंबर रोजी ग्राम सानगडी ता. साकोली येथे संपन्न झालेल्या साकोली विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित केले. २० तारखेला त्यांच्या कमळ या चिन्हाचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले.

संयुक्त सभेला खा.श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री गौरीशंकर बिसेन, सुनील मेंढे, सुनील फुंडे, सत्यनारायण अग्रवाल, सरिता मदनकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, प्रभाकर सपाटे, विनायक बुराडे, अमोक हलमारे, अरविंद लोथे, नेवारे गुरुजी, शालिक हार्डीकर, चतुर्भुज भानारकर, राजूभाऊ हेडाऊ, राजूभाऊ वंजारी, विनोद रुखमोडे, मनोहर नगरकर, नंदूभाऊ हर्षे सहित मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें