…या योजना अविरत चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी विचार करावा : खासदार प्रफुल पटेल 

साकोली, दि. 13 नोव्हेंबर : झेंडा चौक सेंदुरवाफा, ता. साकोली येथे संपन्न झालेल्या साकोली विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री. अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित केले. महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून धानाला यावर्षी सुद्धा हेक्टरी 25 रुपये बोनस मिळवून देणार आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज, किसान सन्मान योजना, कर्जमाफी, लाडली बहीण योजना, मुलींना निःशुल्क उच्च शिक्षण, युवा कार्य प्रशिक्षण च्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे काम सरकार करीत आहे. या योजना अविरत चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी विचार करावा, महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राह्मणकर हे जनमानसात मिसळणार व्यक्ती आहे याचा विचार करूनच मतदान करा असे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.

संयुक्त सभेला खा.श्री प्रफुल पटेल यांच्यासोबत सर्वश्री सुनील मेंढे, प्रकाश बाळबुदे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, पद्माकर गहाणे, शिवराम गिरीपुंजे, नेपाल रंगारी, रेखाताई भाजीपाले, सरिताताई मदनकर, धनवंता राऊत, भूमीता धकाते, भूमालाताई उके, जयाताई भुरे, अमोल हलमारे, किशोर पोगळे, रमेश हातझाडे, रवी परशुरामकर, प्रीती डोंगरवार, हसन कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे, अंगराज समरीत, उमराव आठोले, वनिताताई डोये सहित महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें