- अर्जुनी मोरगाव येथे भव्य जाहीर सभा व संपूर्ण शहरात रॅली थाटात संपन्न.
अर्जुनी मोरगाव, दि.14 नोव्हेंबर : या देशातील सरकारने आतापर्यंत आमच्या मताचा फायदा घेऊन आपली पोळी सेकून घेतली. मात्र आता आम्हाला आमच्या पक्षाचा उमेदवार मिळाला असून आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणून स्वाभिमानाने जीवन जगणे शिकणार आहोत. यासाठी आम्ही आता या निवडणुकीत लढणार आहोत लढेंगे जितेंगे, लढे हे, जिते है, हा अनुभव आम्हाला असल्यामुळे सरकारने हे लक्षात ठेवायला पाहिजे, आदिवासी हा या देशाचा मालक असून चालाक सरकारला आता बदलविल्या शिवाय पर्याय नाही.
त्यामुळे या चालाक सरकारला धडा शिकविण्यासाठी आपण सर्वांनी आता डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठीच ही लढाई आपल्याला लढायची आहे. असे प्रतिपादन गोंडवाना गोंड तंत्र पार्टीचे अध्यक्ष देवरावेन भलावी यांनी केले. ते गोंडवाना गोंड तंत्र पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष तसेच परिवर्तन महासक्ती यांचे वतीने डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचे निवडणूक प्रचारार्थ प्रसन्न सभागृह अर्जुनी मोरगाव येथे दि.13 रोजी जाहीर सभेचे आयोजिन करण्यात आले होते दरम्यान उपस्थित जन समूहाला मार्गदर्शन करताना बोलत होते.
- ही लढाई आपल्या अस्तित्वाची : डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे
यावेळी डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी आदिवासी समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. ही लढाई आपल्या अस्तित्वाची असून आपण सर्वांनी या लढाईत सहभागी होऊन प्रहार करण्यासाठी पुढे येऊन मला विजयी करावं असे आवाहन केलं.
- सुगत चंद्रिकापुरे यांना भरघोस मतांनी निवडून द्या : आमदार मनोहर चंद्रिकापूरे
या बड्या पक्षातील नेत्यांना काम करणारा माणूस नको आहे, त्या मुळे त्यांनी माझा विश्वास घात केला, पाठीत खंजीर खुपसले, केसाने गळा कापला त्या मुळे यांना आता धडा शिकविण्याची वेळ आहे, माझा मुलगा जिवंत आहे, त्या मुळे माझ्या अपमानाचा बडला ही निवडणूक जिंकून माझा मुलगा घेणार त्या मुळे आदिवासी दलीत बांधवांना माझी विनंती आहे. अश्या धोकेबाज लोकांना धडा शिकवावा आणि डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या. हा विजय आमचा नसून सर्व सामान्य माणसाचा विजय असेल, ज्या मुळे मोठ्या पक्षातील लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, हीच ती वेळ आहे, त्या मुळे ही संधी सोडू नका, त्यांना त्यांची जागा दाखवा असे अव्हाहन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मंचावरून केले.
यावेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष देवरावेन भालावी छिंदवाडा, गोंडवाना गोंड तंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष भरत भाऊ मडावी, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई टेकाम, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, शुभांगी वाढवे, किरणभाऊ कोरे, संतोष धुर्वे, मुरारी पंधरे, सुधाकर पंधरे, अतुल मसराम , यशवंत धूरवे, रतिराम कवडो, अस्मिता कोकोडे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सभेला हजारो चे संखेने आदिवासी समाज बांधव व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार उमराव मांढरे यांनी केले.
- अर्जुनी मोरगाव शहरात रॅलीचे आयोजन, शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग.
कार्यक्रमाचे समापन होताच, कार्यक्रमाच्या स्थळावरून जनसंवाद यात्रा संपूर्ण अर्जुनी मोरगाव शहरात फिरली या रॅलीला नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग मिळाला, प्रहार जनशक्ती पक्षाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास या रॅली च्या माध्यमातून दिसून आला. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारा, वडिलांच्या अपमानासाठी, गोर गरिबांच्या न्यायासाठी, त्यांचे हक्कासाठी लढणारा हा संघर्ष योद्धा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार बनेल असा विश्वास या प्रचार रॅलीच्या माध्यमातून मिळालेला लोकांचा सहभागतून स्पष्ट होत आहे.