गोंदिया, दि. 12 नोव्हेंबर : 20 नोव्हेंबर रोजी राज्यात होणारे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून यादरम्यान कुठलेही अमली पदार्थ व रोख रक्कमेवर नजर राहावी म्हणून निवडणूक विभागातर्फे सर्वत्र विविध पथके कार्यरत आहे. गोंदिया जिल्हा उप प्रादेशिक परिवहन चे अधिकारी यांचे पथक फिरत असताना अडाणी प्रकल्पासमोर एक वाहन आढळून आले त्यांची तपासणी केली असताना त्यामध्ये 15 लाख रुपये आढळून आले. त्यामुळे वाहनाला जप्त करत तिरोडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र केसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी या बाबद तशी माहिती दिली.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 279