गुड्डू बोपचे यांच्या प्रचारासाठी रोहित पावर यांची सभा, विद्यमान आमदारावर संतापले!

  • निवडणुन येतचा आपल्या मानधनाचा 60 % निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याना करिता खर्च करणार : गुड्डू बोपचे.

गोंदिया, दि. 14 नोव्हेंबर : तिरोडा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार गुड्डू बोपचे यांच्या प्रचारासाठी रोहित पवार यांनी गोरेगाव शहरात प्रचार सभा घेत तिरोडा शहरात आले असता विद्यमान आमदारच्या विकास कामांचा चांगलाच समाचार घेतला.

मागील निवडणुकीत देखील गुड्डू बोपचे यांना राष्ट्रवादी कॉग्रेस ने तिरोडा विधानसभा क्षेत्रात निवडणुक लढण्याची संधी दिली होती मात्र त्यांचा अल्प मताने पराभव झाला असला तरी खचून न जाता त्यांनी सतत पाच वर्ष मतदार संघातील लोकांच्या समस्या जाणून घेत समस्या सोडविल्या त्यामुळे या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी गुड्डू बोपचे यांना देण्यात आली. 

त्यांच्या प्रचासाठी युवा नेते रोहित पवार यांनी दवणीवाडा आणी गोरेगाव शहरात प्रचार सभा घेत विद्यमान आमदारचा चांगलाच समाचार घेत महाविकास आघाडीची सरकार येताच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील समस्या प्राधान्याने सोडवू असे आश्वासन रोहित दादा पवार यांनी दिले आहे.

  • निवडणुन येतचा आपल्या मानधनाचा 60 % निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याना करिता खर्च करणार : गुड्डू बोपचे.

तर महाविकास आघाडीचे उमेदवार गुड्डू बोपचे यांनी मतदार संघात निवडणुन येतचा आपल्या मानधनाचा 60 % निधी हा मतदार संघातील जे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही किंवा ज्या लोकांना आरोग्य सुविधा वेळीच मिळत नाही अस्या लोकांवर आणी उर्वरित निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याना करिता खर्च करणार असल्याचे सांगितले. तर रोहित दादा पवार यांना एकन्या करिता हजारो लोकांनी गर्दी केली असून 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू बोपचे यांना निवडून देऊ असा विश्वास मतदारांनी रोहित दादाना दिला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें