गोंदिया, दि. 13 नोव्हेंबर : पूर्व विदर्भातील चिमूर येथे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत महायुतीची विशाल जनसभा दि. 12 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली. या सभेला विदर्भातील महायुतीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत सर्व उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेशी खासदार प्रफुल पटेल यांनी संवाद साधला.
ते मंचावरून वरून बोलताना म्हणाले की आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या क्रमांकावर आहे. येत्या काळात आपली अर्थव्यवस्था जगातील पहिल्या तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन कार्य करत आहोत.
मागील वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याचे कार्य महायुतीने केले आहे, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ होईल.
केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. भविष्यातही राज्याचा विकास अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.