माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयकडून समन्स

न्यू दिल्ली, वृतसेवा, दिनांक २२ एप्रिल २०२३ :  केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीमुळे 2019 मध्ये पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला होऊन 40 जवान शहीद झाले होते. तसेच जम्मू-कश्मीरातील जलविद्युत प्रकल्प आणि विमा योजनेत भ्रष्टाचार झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्पोट माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत सात दिवसांपूर्वी केला.

या नंतर आता सीबीआयकडून मलिक यांना समन्स बजावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. सरकारी कर्मचारी समूह वैद्यकीय विमा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना चौकशीसाठी बोलावल अश्ल्याचे सर्वत्र वृत्त आहे. तशी त्‍यांना नोटीस जारी करण्यात आली अश्ल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी आपण 27 ते 29 एप्रिल दरम्यान उपलब्ध असल्याचे मलिक यांनी ‘सीबीआय’ ला कळविल्याची माहिती आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें