तालुका कृषी अधिकारी अडकला ACB च्या जाळ्यात!


नाशिक, वृतसेवा, दिनांक : २२ एप्रिल २०२३ : सिन्नर तालुका कृषी अधिकारी व निफाड तालुक्याचा अतिरिक्त कारभार असणाऱ्या अण्णासाहेब हेमंत गागरे याला लाच लुचपत प्रतिबंधित विभागाने ताब्यात घेतले. नाशिकरोड येथील प्राइड अपार्टमेंट येथे राहणाऱ्या घोगरे यांना शुक्रवारी रात्री सिन्नर एमआयडीसी परिसरात लाच घेताना रंगेहाथ पकडले. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर एमआयडीसीमध्ये एका उद्योजकाने उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरीत करण्यात येत असते.

परंतु या उद्योजकाची यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे लाचखोर गागरे याने भासवले. अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात या चार लाखांची मागणी केली. तडजोडीअंती अखेर 2 लाख रुपयांची लाच घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर या प्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेचा पहिला हफ्ता 50 हजार रुपये घेताना गागरे हा एसीबीच्या पथकाला सापडला आहे. या प्रकरणी गागरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें