पोलिस उपनिरीक्षक अडकला एसीबी च्या जाळ्यात!


कोल्हापूर, वृत्तसेवा, दीं. 21 एप्रिल : 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रूपयाची लाच घेणार्‍या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

सोमनाथ देवराम चळचुक ( वय 48, एएसआय, जयसिंगपूर पोलिस स्टेशन कोल्हापूर रा. विजयमाला नगर, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर. मुळ रा. बाडगी, ता. पेठ, जि. नाशिक ) असे लाच घेणार्‍या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

ते कोल्हापूर जिल्हयातील जयसिंगपूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी जयसिंगपूर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रार अर्जावर कारवाई करून त्यांची ओमनी कार त्यांना गैरअर्जदार यांच्याकडून परत मिळवून देण्यासाठी सोमनाथ चळचुक यांनी 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती 10 हजार रूपयांची लाच घेण्याचे ठरले. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, सरकारी पंचासमक्ष सोमनाथ चळचुक यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरज यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उप अधीक्षक सरदार नाळे पोलिस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलिस हवालदार विकास माने, पोलिस नाईक सचिन पाटील, पोलिस अंमलदार मयुर देसाई, चालक हवालदार सुजर अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें