ग्राम सेवकाने मागितली ५० हजार रुपयाची लाच! भाऊ झाला रंगेहात अटक


नाशिक, दी. १५ एप्रिल २०२३ : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. नितीन सगाजी मेहेरखांब (वय ४२ वर्ष, ग्रामसेवक, सजा पाथरे (ता. सिन्नर) रा. त्रिमूर्ती चौक, फ्लॅट नंबर 02, संगमनेर, जि. अहमदनगर) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

त्याने तब्बल ५० हजाराची लाच मागितली होती. यातील २५ हजार रुपये लाचेचा पहिला हप्ता घेताना तो रंगेहाथ सापडला आहे. पाथरे येथे राहणाऱ्या एका ग्रामस्थाचे जुने घर आहे. या घराचा काही भाग व ओटा तोडून दोन मजली इमारत त्याला बांधायची होती. त्यासाठी सदर गावठाण मधील इमारतीची नोंद करणे आणि इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घराची घरपट्टी ठरवणे आवश्यक होते.

या कामाच्या मोबदतल्यात लाचखोर ग्रामसेव मेहेरखांब याने थेट ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. लाचेचा पहिला हप्ता २५ हजार रुपये घेताना लाचखोर मेहेरखांब हा १३ एप्रिल रोजी एसीबीच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला आहे.

सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. न. 9881473083
सापळा पथक पो. हवा. सचिन गोसावी., पो. हवा. प्रफुल्ल माळी. चा. पो. ना. परशुराम जाधव. मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391


 

Leave a Comment

और पढ़ें