महिला पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार अटकले एसीबी च्या जाळ्यात.


अहमदनगर, दिनांक : १४ एप्रिल २०२३ : येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके व पोलीस अंमलदार संदीप रावसाहेब खेंगट यांच्यावर नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रात्री उशिरा कारवाई केली. पोलीस अंमलदार खेंगट याला आठ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. असून महिला उपनिरीक्षक डोके व खेंगट यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान लाच मागितल्याचे समोर आल्याने त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम १४ रोजी च्या रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

तक्रारदार यांच्या मुलावर विनयभंग व पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास परि. महिला उपनिरीक्षक डोके या करीत आहेत. तक्रारदार यांच्या मुलाला दाखल गुन्ह्यात जमीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी उपनिरीक्षक डोके व अंमलदार खेंगट यांनी आठ हजार रुपयांची मागणी केली होती.

यानंतर गुरूवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ हजार रुपयांची लाच घेताना अंमलदार खेंगट याला रंगेहाथ पकडले. उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें