खासदार सुनील मेंढे यांनी जयंती निमित्त बाबा साहेबांना केले अभिवादन!


भंडारा, दिनांक : १४ एप्रिल २०२३ : छत्रपती शिवाजी क्रीडा मैदान भंडारा येथे एकविध क्रीडा संघटना, भंडारा तर्फे आयोजित उष्णकालीन शिबिराच उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थित संपन्न झाले. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. सर्व विद्यार्थ्यांना या शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा असे प्रोत्साहन केले. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता अशा शिबिराचे आयोजन आवश्यक आहे. तसेच या प्रसंगी लहान मुलांनी खा. सुनील मेंढे यांचा  वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांना आनंद द्विगुणित झाला. या प्रसंगी सर्वश्री सूर्यकांत ईलमे, सुनील करंजेकर, आशिक चुटे, राजेंद्र भांडारकर, प्रशांत शेंडे, आकाश खोत, निशिकांत ईलमे, शामू बांते, विकास बागडे, भोजराम चौधरी, गणेश साकोरे, तुषार काळबांडे, चैतन्य उमाळकर, सौरभ तोमर, अक्षय गिरडकर, शोएब अंसारी, राजेंद्र पिल्लारे आणि विविध खेळाचे मार्गदर्शक व खेळाडू उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें