नायब तहसीलदार अडकला एसीबी च्या जाळ्यात!


ठाणे, वृत्तसेवा, दी. 13 एप्रिल : शेतजमीनीचे अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त 1 लाख 42 हजार रूपयांच्या लाचेची स्वतः करिता व इतर लोकसेवकांकरिता मागणी करून ती रक्कम घेताना नायब तहसीलदाराला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

वासुदेव बिसन पवार (57, निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालय, ठाणे ) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीची शेतजमीन अकृषिक करावयाची होती. त्यासाठी निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांनी शासकीय फी व्यतिरिक्त 1 लाख 42 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, (सोमवारी) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सरकारी पंचासमक्ष निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांनी तक्रारदाराकडून 1 लाख 42 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक प्रमोद जाधव, सहाय्यक फौजदार शिंदे, पोलिस हवालदार पवार, गोसावी, महिला पोलिस हवालदार जोंधळे आणि अंमलदार भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें