पोलिस उप निरीक्षक अडकला एसीबी च्या जाळ्यात!


औरंगाबाद, वृत्तसेवा, दी. 13 एप्रिल : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच 107 नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 75 हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

गणेश शेषेराव शिंदे (वय 35) असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी ( दि.12 ) रोजी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत 51 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली आहे. गणेश शेषेराव शिंदे हे कदीम जालना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस

ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. त्यामुळे गणेश शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयाची लाचेची मागणी केली.

तडजोडी अंती 75 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता गणेश शिंदे याने एक लाख रुपये लाचेची मागणी करुन

75 हजार रुपये स्विकाण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर शिंदे याला पथकाचा संशय आल्याने तो लाचेच्या रकमेसह स्वतःच्या खाजगी वाहनातून पळू गेला. पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून आरोपीला पकडले.

गणेश शिंदे याने लाचेची रक्कम फेकून देऊन पुरावा नष्ट केला. पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता गाडी मध्ये रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये व 25 तोळे (250 ग्रॅम) सोने मिळून आले आहे.
आरोपी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे याच्यावर कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली
औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर
पोलीस अंमलदार नागरगोजे, काळे यांच्या पथकाने केली आहे.@pn


 

Leave a Comment

और पढ़ें