क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्ताने खासदार सुनिल मेंढे यांनी केले अभिवादन!


भंडारा दि.11 : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती आज सामाजिक न्याय सभागृहात साजरी करण्यात आली. इतर मागास बहूजन कल्याण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गांधी चौक भंडारा येथील महात्मा फुलेंच्या पुतळयाला खासदार सुनिल मेंढे व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी परिसरातील गणमान्य नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते. त्यानंतर जिल्हास्तरावरील कार्यक्रम सामाजिक न्याय सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार सुनिल मेंढे, उपायुक्त जात पडताळणी डॉ. मंगेश वानखडे, मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा विनोद जाधव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनिषा कुरसुंगे यांच्या सह नगरपरिषदेचे सदस्य आशु गोंडाणे, श्री. चढढा उपस्थित होते.

खासदार सुनिल मेंढे यांनी यावेळी महापुरूषांच्या जिवन चरीत्रातुन बोध घेवून विदयार्थ्यानी त्यांच्या शैक्षणीक आयुष्यात प्रगती केली पाहीजे असे प्रतिपादन केले. महात्मा फुले यांच्याविषयी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी अतिशय प्रेरणात्मक भाषण दिले .यावेळी त्यांनी ग्रॅण्ड डफनंतर शिवाजी महाराजावर एकमेव पोवाडा लिहणारे महात्मा फुले यांच्या समग्र व्यक्तीमत्वाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणातुन महात्मा फुलेचे जीवन चरीत्र उलगडून दाखवले. श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाने विदयार्थी प्रभावित झाले.
मनिषा कुरसुंगे यांनी ही स्त्री पुरूष शिक्षणासाठी जोतिबांनी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी घेतला. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषीत करण्यात आली. तर स्वयंसेवी संस्थानाही पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार समाज कल्याण विभागाचे कर्मचारी श्री. गणवीर यांनी व्यकत केले.


 

Leave a Comment

और पढ़ें