अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर तहसिलदाराची कारवाई


साकोली, दिंनाक : 10 एप्रिल 2023 : साकोली तालुक्यातील ग्राम परसोडी नदी पात्रातून अवैध रित्या वीणा परवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर तहसीलदार यांनी आज कारवाई केली आहे. तहसीलदार गौरव इंगोले यांनी ही कारवाई आज सकाळी 09.30 वाजता केली आहे.

वाहन क्रमांक : एम एच 35 जी 9021 असे असून वाहन मालक भीमराव महादेव कापगते राहणार परसोडी असे आहे. तहसीलदारांनी सदर वाहन तहसील कार्यालयात लावले आहे. प्राप्त माहिती नुसार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर 1 लाख 15 हजार 400 रुपयाचा दंड आकारला जातो त्या मुळे या भागातील वाळू माफियांचे सध्या धाबे दणाणले आहेत.

भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आगमनाने जिल्ह्यात वाळू वाहतूक काही काळ बंद होती. त्या नंतर पुन्हा वाळू माफियांनी डोके बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे परसोडी गावातून वाळूची वाहतूक सातत्याने होत असल्यामुळे गावाच्या सुरवातीला पोलिश चौकी लावण्यात आली आहे.

मात्र त्या चौकीचा कुठलाही फायदा होत नाही. पोलिसांच्या समोरून वाळूची नियमित वाहतूक चालू असते. असे काही गावकरी सांगतात. त्या मुळे नुकतेच पद भार सांभाळणारे तहसीलदार वाळू माफियांना भुरळ घालनार का? असा सवाल देखील या निमित्ताने विचारला जात आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें