अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर कार्यवाई


गोंदिया, दिनांक : २६ मार्च : दि. 25 मार्च रोजी रात्री 01.35 वाजता दरम्यान मौजा – किन्ही घाट येथील वैनगंगा नदी पात्रातुन किन्ही गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून छापा कारवाई केली असता अवैधरित्या गौण खनिज रेतीची चोरी करणाऱ्या दोघांना ट्रॅक्टरसह पकडण्यात आले. सदर प्रकरणी पो. ठाणे रावणवाडी येथे ट्रॅक्टर चालक – मालक नामे 1) अमितसिंग नरेश सिंग जतपेले वय 27 वर्षे रा. किन्ही , तालुका जिल्हा- गोंदिया, ट्रॅक्टर क्र. MH- 35 AR – 1545, 2) संजय परदेशी कहानवत वय 37 रा. किन्ही तालुका जिल्हा- गोंदिया ट्रॅक्टर क्र. MH- 35 AR- 3089 चा (चालक – मालक,) याचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379, अन्वये गुन्हा नोंदविण्या त आलेला असुन त्यांचे ताब्यातून 1) एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनी चे ट्रॅक्टर क्र .MH 35 AR 1545 व 1/2 ब्रास रेती 2) एक निळ्या रंगाचे पॉवर ट्रॅक कंपनीचे ट्रॅक्टर क्र .MH 35 AR 3089 व 1/2 ब्रास रेती  असा एकूण- 12 लाख, 3000 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई रावणवाडी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शना खाली स्था. गु. शा. चे पो. नि. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्था. गु. शा. येथील पथक मपोउपनि. वनिता सायकर, पोहवा. भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, रियाज शेख, पोशि संतोष केदार, मपोशि स्मिता तोंडरे, यांनी केलेली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें