घरकुल झाला जनावरांचा गोठा; अनेक गरजू मात्र उघड्यावरच!


सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : २६ मार्च २०२३ : २०१६-१७ मध्ये प्रधान मंत्री आवास यौजना संपूर्ण देश्यात लागू झाली. त्या नंतर रमाई आवास यौजना आणि सबरी आवास यौजना देखील चालू झाली. देश्यातील नागरिकांना हक्काचा घर मिळावा कुणीही घरा विना राहू नये म्हणून प्रशासनाने या यौजनेला निधीची कमतरता पडू दिला नाही. मात्र ज्यांना राहण्यासाठी चांगले मजबूत घर आहेत. अश्यांना देखील या यौजनेत पक्के घर मिळाले. एवढेच नाही. तर एकाच घरातील अनेक सद्श्यांना घरकुलाचा लाभ मिळाला. ज्यांचे पक्के घर आहे. असे काही शेतकरी वर्गातील लोक या घरात तनस भरून ठेवतात. तर जनावरेही बांधतात. काही लोक आपले घर दुशर्याला किरायाने देतात. असे दृश्य सध्या पाहण्यासाठी मिळत आहे.

आता या सर्व प्रकाराला जबाबदार कोण ? हा देखील संसोधनाचा विषय आहे. काही सरपंच म्हणतात पंचायत समिती चे अधिकारी याला जबाबदार आहेत. तर पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतात. याला सरपंच लोक जबाबदार आहेत. त्यांनी ग्राम सभेत ठराव मंजूर करून गरजू लाभार्त्यांची यादी आमच्याकडे पाठवावी. मात्र तसे होत नाही. गाव पातळीवर राजकीय लोक आपल्या जवळीक लोकांना यौजनेचा फायदा करून देतात असी चर्चा आहे. मात्र काही खऱ्या गरजूंना अध्यापही घरकुल यौजनेचा लाभ मिळाला नाही हे खरे सत्य आहे. आजही खरे गरजू लोक मातीच्या पडक्या घरात राहतात. काही लोक मांडो घालून छतावर पाल टाकून राहतात. असे चित्र आहे. खऱ्या गरजू लोकांना घरकुल यौजनेचा लाभ मिळाला पाहिजे या साठी प्रशासन कुठेतरी कमी पडते असे यावरून लक्ष्यात येते.

श्री. वाय. पी. फुले घरकुल नोडल अधिकारी, पंचायत समिती, सडक अर्जुनी, गोंदिया.: जे लाभार्थी मिळालेल्या घरकुल चा चुकीचा वापर करीत असतील तर अश्यावर आमचे प्रशासन योग्य ती कार्यवाई करेल.  घरकुल बांधकामासाठी १ लाख ५० हजार रुपये चा निधी लाभार्त्याला मिळते. यातील २० हजार रुपये हे महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत असतात. काही लाभार्थी पहिला हप्ता उचल करतात मात्र बांधकामाला सुरवात करीत नाही. त्या मुळे अन्य लाभार्त्यांला यौजनेचा उशीरा लाभ मिळते. २०२१-२२ मध्ये तालुक्यात प्रधान मंत्री आवास यौजने करिता १५३२ बांधकामांना मंजुरी मिळाली. रमाई आवास यौजने मध्ये ४४१ बांधकामांना मंजुरी मिळाली तर सबरी आवास यौजनेत ७७ बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. एकूण २०५० घरकुल  बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. २६९ स्केअर फिट मध्ये बांधकाम करणे बंधनकारक असते.


 

Leave a Comment

और पढ़ें