सौन्दड गावात अवैध दारू विक्रीचा महापूर, डूग्गीपार पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष


सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : २६ मार्च : तालुक्यातील सर्वात मोठे लोक संखेने अश्लेल्या सौन्दड गावात देशी आणि विदेशी दारूची विक्री लपत छपत नाही तर खुले आम अवैध रित्या जोमात चालू अश्ल्याचे चित्र आहे. टेबल लाऊन चकना आणि दारू ची विक्री केली जाते. कदाचित अधिकारी या लोकांकडून हप्ते घेत अशतील त्या मुळे कार्यवाई करीत नाही. या पूर्वी महाराष्ट्र केसरी न्यूज ने बातमी प्रकाशित केली होती. त्या नंतर डूग्गीपार पोलीशांनी स्फूर्ती दाखवत अवैध दारू विक्री करणाऱ्या एकावर कार्यवाई केली होती. डूग्गीपार पोलिस विभाग आणि आपकारी विभाग देवरी यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कार्यवाई केली पाहिजे मात्र तसे दिसत नाही. काही कार्यकर्ते राजकीय लोकांचा नाव सांगतात त्या मुळे देखील पोलीस अश्या लोकांना सोडून देते.

गावातील नुकतेच निवडून आलेले कथित सरपंच यांनी गावातील सर्व चालू अवैध वेवसाय आपण बंद करणार अशी ग्वाही पत्रकारांना पत्र परिषदेत दिली होती. मात्र त्यांचेच काही कार्यकर्ते या अवैध वेवसायात लिप्त आहेत. सौन्दड गाव अवैध वेवसायाचा सध्या माहेर घर बनला आहे. गावात सट्टा पट्टी खायवाली चा अड्डा चालते, जुव्वा ( पत्ते ) खेळवले जातात, देशी विदेशी दारू विना परवाना म्हणजेच अवैध रित्या विक्री केली जाते. वाळूचा विना परवाना उपसा आणि गावातून वाहतूक जोमात चालू असते. असे अशले तरी सरपंचाने अध्याप दक्षता समिती मार्फत. कुठलीही कार्यवाई केल्याचे चित्र दिसत नाही. त्या मुळे आमचे सरपंच खोटारडे आहेत का ? असा सवाल अनेकांच्या मानात निर्माण झाला आहे.

विशेष सांगायचं म्हणजे सरपंच साहेब यांच्याच घरातील एका वेक्तीचे देशी दारू विक्रीचे ठोक व्यापार आहे. त्या मुळे गावात अवैध रित्या देशी दारू विक्री करणाऱ्या चिल्लर दुकान धारकाकडे कार्यवाई दरम्यान मिळालेली दारू ही कोणत्या ब्याच नम्बर ची आहे. त्याचा शोध देखील संबंधित विभागाने घ्यावा. त्यावरून लक्ष्यात येणार की गावात अवैध रित्या विक्री होणारी दारू चा खरा मालक कोण आहे ? मोठ्या राजकीय पक्षात राहून अनेक लोक आपला अवैध कारभार थाटून चालविण्याचा धाडस करतात. आणि बातम्या लावणाऱ्या पत्रकाराचा विनाकारण निषेध आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ग्रुप मध्ये करतात. मात्र सत्य कधीही लपणार नाही. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी होत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें