काळा बिबट शिकार प्रकरनी तीन आरोपींचा भंडारा जेल मध्ये मुक्काम 


सडक/अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : ०४ मार्च २०२३ : २६ फेब्रुवारी रोजी वन विभागाने पकडलेल्या ५ आरोपींना सडक अर्जुनी न्यायालया समोर २७ फेब्रुवारी रोजी हजर केले असता. मा. तालुका न्यायालयाने त्या पाचही आरोपींना ०२ फेब्रुवारी पर्यंत वन कोठडी सुनावली होती. तर २ मार्च २०२३ रोजी पुन्हा पाचही आरोपींना मा. न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी १) श्यामलाल मडावी, २) दिवारू कोल्हारे, ३) अशोक गोटे या तिन्ही आरोपींना १५ मार्च २०२३ पर्यंत न्यायालईन कोठडी सुनावली आहे. त्या मुळे तिन्ही आरोपींना त्याच दिवसी भंडारा जेल मध्ये रवाना करण्यात आले आहे. तर यातील दोन मुख्य आरोपी ४) माणिक ताराम, ५) रवींद्र बोडगेवार यांना ०४ मार्च २०२३ पर्यंत पुन्हा वन कोठडी सुनावली आहे. यात पुन्हा दोन संसइत आरोपीना ०३ मार्च रोजी वन विभागाने ताब्यात घेतले आहे. वनविभागाचे अधिकारी घटनेचा कसून तपास करीत आहे. यात अजून काही हाती लागते का ? याचा शोध सुरु आहे. वन परीक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत वन्यजीव व्याग्र प्रकल्प नवेगाव नागझिरा यांच्यासह अन्य अधिकारी तपास करीत आहेत.



नेमक प्रकरण काय आहे ते पाहू या : गोंदिया जिल्ह्यातील चिचगड वनविभाग व पोलिसांनी रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी पालांदूर जमी. येथे झडतीदरम्यान एका आरोपीला अटक करुन वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले होते. दरम्यान त्याच दिवशी रविवारी मंगेझरी येथून आणखी चार आरोपींना अटक करण्यात वन विभागाला यश आले. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले आहे.

जिल्ह्यात वन्यप्राण्याच्या अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकार्यांना मिळाली होती. त्या नुसार वनधिकार्यांनी पोलिसांसह रविवार, २६ फेब्रुवारीला संयुक्त कारवाई प्रथम पालांदूर जमी. येथे केली. यात रवींद्र लक्ष्मण बोडगेवार यांच्या घराच्या झडतीत वाघाचे नख व दात व अस्वलाचे हृदय तसेच २१ लाख रुपये रोख व ८४ हजार रुपयांची देशी दारु जप्त केली होती.

त्या नंतर मंगेझरी येथे धाड टाकून चार आरोपींना अटक केली. शामलाल विक मडावी, दिवास कोल्हारे, माणिक दरसू ताराम, अशोक गोटे सर्व रा. मांगेझरी अशी आरोपींची नावे आहे. यातील आरोपी माणिक दरसू ताराम हा आत्मसमर्पित नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींच्या ताब्यातून वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्यांचे २ दात, १ नख, अस्वलाची ३ नखे, १० रानडुक्कर सुळे, चितळाचे १ शिंग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले, ताराचे फासे, १ जीवंत मोर, ५ बंडल मोरपिसे, रानगव्याचे ृ शिंग, जाळे, सुकलेली हाडे, रक्त पापडी ( झाडाची साल ), सुकवलेले मांस हस्तगत करण्यात आले.

पाचही आरोपी विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला. तपासात आरोपींनी दुर्मिळ काळा बिबटची शिकार केल्याचेही समोर आले व त्याबाबतचे पुरावे हस्तगत करण्यात आले. दरम्यान, आरोपींकडून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम दारू विक्रीतील नसून वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या व्यवहारातून मिळाली असावी, असा संशय पोलिसांना आणि वन विभागाला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें