सडक अर्जुनी, दिंनाक : 12 फेब्रुवारी 2023 : ग्रामीण पाणी टंचाई योजना अंतर्गत टप्पा तिसरा माहे एप्रिल ते जून कृती आराखडा तयार करण्याकरिता दी.14 फेब्रुवारी 2023 रोजी पंचायत समिती येथे गट विकास अधीकारी व सरपंच/सचिव यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्या अनुसंघाने उन्हाळयात पाणी टंचाई वर मात करण्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच व सदस्यांनी हात पपांची स्वतः पाहणी केली आहे. सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच भावराव यावलकर सह अन्य सदस्यांनी चक्क गावातील हात पपाची पाहणी करून ना दुरुस्त हात पंप दुरुस्त करणार असून गावात ज्या भागात नवीन हात पपांची आवश्यकता आहे. अश्या ठिकाणी नवीन हात पंप लाऊन देणार असे सांगितले आहे.
दरवर्षी सौंदड गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्या मुळे महिला वर्गाला शेताकडे भटकंती करावी लागते. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सौंदड गावात उन्हाळ्यात महिना महिना पिण्याच पाणी मिळत नाही. त्या मुळे नव्या सरपंच बॉडीने उन्हाळा येण्या आधीच यावर उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. पाणी टंचाई आराखड्याच्या बेठकीत गावातील विविध समस्या ठेऊन आवश्यक असल्यास साहित्याची मागणी करण्यात येणार आहे.