लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास सह द्रव्य दंडाची शिक्षा


गोंदिया, दिनांक : १४ जानेवारी २०२३ : २०१४ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समीती, मरघट रोड गोंदिया चे बाजुला असलेल्या खुल्या घरात काही नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने पीडित अल्पवयीन मुलीचे तक्रारी वरुन पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक – २२४/२०१४ कलम ३७६ (ड) भा.द.वि. सहक- ४,५ (एल), ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतीबंधक कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान गुन्ह्यात आरोपी  १) शंकर सुरजकुमार सागर, वय २६ वर्षे, रा. दसखोली, मरघट रोड गोंदिया. २) खन्ना राजकुमार कुमार, वय २० वर्ष, रा. दसखोली, गोंदिया यांना अटक करण्यात आली. गुन्ह्याचे तपासात नमूद आरोपी यांनी अल्पवयीन पीडित मुलीवर शारीरिक लैंगिक अत्याचार (बलात्कार) केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीतां विरुध्द सबळ साक्षपुरावे गोळा करून मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश न्यायालय, गोंदिया येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. मा सत्र न्यायालय गोंदिया येथे फौजदारी स्पेशल खटला क्र.१६/ २०१५ प्रमाणे चालविण्यात आला.

सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी १) शंकर सुरजकुमार सागर, वय २६ वर्षे, रा. दसखोली, मरघट रोड गोंदिया यांचे विरूध्द साक्षपुराव्या वरून दोषसिध्द झाल्याने मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. अरविंद वानखेडे, न्यायालय गोंदिया यांनी दिनांक- ११/०१/२०२३ रोजी बुधवारला नमूद आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि २०,०००/- रू. द्रव्य दंडाची शिक्षा, व दंड न भरल्यास ६ महिण्याची अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी नामे २) खन्ना राजकुमार कुमार, वय २० वर्षे, रा. दसखोली, गोंदिया हा फरार आहे. वरील नमूद शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, यांनी केलेला आहे. तर खटल्याचे युक्तीवाद सरकारी अभियोक्ता श्री. वसंत चुटे यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचे कोर्ट पैरवी म्हणून न्यायालयीन कामकाज म.पो.हवा. टोमेश्वरी पटले, यांनी केले आहे. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, सुनिल ताजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, यांनी तसेच पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक  चंद्रकांत सुर्यवंशी यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी व गुन्ह्याचे अनुषंगाने तपास कामात, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत सहाय्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.


 

Leave a Comment