खा. सुनील मेंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट


नागपूर, दिनांक : ११ जानेवारी २०२३ : भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १० जानेवारी ला भेट घेतली. यावेळी लोकसभा क्षेत्र भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काही प्रमुख समस्यांबद्दल चर्चा झाली.  उपमुख्यमंत्र्यांनी भंडारा शहरासाठी मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असून त्याचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भटकी, मांग, गारुडी इ. लोकांपर्यंत घरकुलांसाठी उपलब्ध होणारा निधी सहजरीतीने कसा पोचवता येईल याबद्दल ही चर्चा झाली.

वैनगंगा नदीत इकॉर्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे त्याचे पाणी दूषित होत आहे, त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वैनगंगा नदी शुद्धीकरण्यासाठी पण चर्चा झाली. सोबतच पर्यटन विकासाकरीता ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने संवाद साधला. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना शासनाने जो बोनस जाहीर केला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
या वेळी खासदार सुनील मेंढे, कवलजीत ( रूबी ) चड्ढा माजी नगरपरिषद उपाध्यक्ष, आशु गोंडाने माजी नगरपरिषद उपाध्यक्ष उपस्थित होते.


 

Leave a Comment