गोंदियातील केबीसी विजेते द्वाराकाजित मंडले यांना मोना सुझुकीने दिली एक्सेस गाडी भेट


गोंदिया, दिनांक : ०९ जानेवारी २०२३ : जिल्यातील द्वाराकाजित मंडले या तरुणाने सोनीटीव्ही प्रस्तुत कोण बनेगा करोडपती या ट्वेलिव्हिजन शो मध्ये भाग घेत १२ लक्ष ५० हजार रुपये जिंकले असून केबीसी मध्ये खेळणारा द्वाराकाजित मंडले हा जिल्यातील पहिला तरुण असून गोंदियातील मोना सुझुकीच्या वतीने त्याला एक्सेस गाडी भेट देण्यात आली.

गोंदिया जिल्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या कुंभीटोला गावातील द्वाराकाजित मंडले हा तरुण कुंभीटोला गावात पानटपरी चालवून स्वतःचा कुटूंब चालवत असून त्याचे स्वप्न होते. कि तो देखील सोनी टीव्ही प्रस्तुत केबीसी च्या कार्यक्रमात पोहचेल या साठी द्वाराकाजितने मागील तीन वर्षा आधी पासून प्रयत्न केले. असून डिसेंबर २०२२ मध्ये द्वाराकाजितला केबीसी मध्ये खेडणायचा योग्य प्राप्त झाला. असता त्या ठिकाणी गेल्यावर महानायक अभिताभ बचन यांनी द्वाराकाजितला प्रशन केला कि मिळालेल्या पैस्यातुन तू काय करणार यावर उत्तर देताना द्वाराकाजित म्हणाला मेरे पास टुव्हीलर गाडी नाही है तो मै जीते हुए पैसो से एक गाडी लुगा.

हि बाब गोंदियात केबीसी कार्यक्रम पाहणाऱ्या पियुष अग्रवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी गोंदियाविधानसभा ग्रुप च्या माध्यमातून द्वाराकाजितने केबीसीच्या स्टेजवर जाऊन गोंदिया जिल्याचा नाव मोठा केल्याने द्वाराकाजितला मोना सुझुकीच्या वतीने एक्सेस गाडी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली असून द्वाराकाजित मंडले यांना आज मोना सुझुकीच्या शोरूम मध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल तसेच गोंदिया विधानसभा ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थित द्वाराकाजित मंडले यांना एक्सेस गाडी भेट देण्यात आली असून द्वाराकाजित मंडले यांनी मोना सुझुकी शहर  गोंदिया विधानसभा ग्रुप चे आभार मानले असून मोना सुझुकीयाच्या माध्यमातून त्यांचा आज दुचाकींचा स्वप्न पूर्ण झाला.


 

Leave a Comment