म्यागनीज वाहून नेणारे वाहन आगीत स्वाहा !


सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : 02 जानेवारी 2023 : एक जानेवारी हा आनंदाचा दिवस सर्वत्र साजरा करण्यात जनता वेस्त होती. अश्यातच देशात विविध ठिकाणी आगीत जाळपोळ च्या घडल्या आहेत. अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातही घडली आहे.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वरून नागपूर कडून रायपूर कडे जाणारे वाहन क्रमांक : सी. जी. 04 एन. एस. 9458 हे राष्ट्रीय महामार्ग वरून जात असताना वाहनावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन मुख्य मार्गावरील दुभाजकाला धडकले यात वाहन पुलाच्या खाली पडले अश्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मात्र सदर वाहन संपूर्ण आगीच्या स्वाधीन झाले. मिळालेल्या माहिती नुसार या वाहनात म्यागनीज होते. आता ते वेध होते की अवैध याबाबद अध्याप माहिती नाही. जळालेल्या वाहनाला सडक अर्जुनी येथील नगर पंचायत च्या अग्नीशमनदलाच्या वाहनाने विझविले विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर रोज लाखोचा टोल वसुली केली जाते. मात्र टोल कंपनी कडे अग्निशमन दलाची सुविधा नाही. राष्ट्रीय महामार्गावर विविध सुविधा पुरविण्याचे काम सदर कंपनीचे आहे. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत अश्ल्याचा आरोप होत आहे. स्थानिक लोक प्रतिनिधी सुद्धा या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत अश्ल्याचे चित्र आहे.


 

Leave a Comment