लष्कराच्या गाडीला अपघात १६ जवान शहीद !


सिक्कीम, दिनांक : २३ डिसेंबर २०२२ : आज एक मोठा रस्ता अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लष्कराच्या गाडीला अपघात होऊन १६ जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममधील गेमा येथे ही घटना घडली. लष्कराचा हा ट्रक सकाळी चतनहून थांगूच्या दिशेने निघाला होता. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर लष्कराच्या तीन वाहनांपैकी एक ट्रक तीव्र उतारावरून घसराला. यात गाडीतील १६ जवान शहीद झाले असून, चार जवान जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून, अपघातातील चार जखमी जवानांना उपचारांसाठी विमानाने हलवण्यात आले. या रस्ते अपघातात तीन कनिष्ठ आयोग अधिकारी आणि 13 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सिक्कीममध्ये लष्कराच्या गाडीला झालेल्या अपघात शहीद झालेल्या जवानांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले. घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त करत जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे.


 

Leave a Comment