खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत साकोली येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न


भंडारा, दिनांक : १३ नोहेंबर २०२२ : साकोली येथे सुनील फुंडे यांच्या निवास स्थानी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी श्री पटेल यांच्या सोबत ग्रामपंचायत निवडणूक व अन्य विविध समस्यांवर सविस्तर १२ रोजी चर्चा केली. या प्रसंगी खासदार श्री पटेल म्हणाले की, महागाई व जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमती कमी करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या विद्यमान केंद्र व राज्य सरकार ने मार्गी लावाव्यात. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेले मागील वर्षीच्या बोनसचे पैसे DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात यावे.

मशागतीला लागणारा खर्च, खते व किटकनाशकांच्या वाढत्या किंमती व नैसर्गिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदील झाला आहे. करिता महाराष्ट्र शासनाने धानाला 1000 रूपये बोनस देण्यात यावा. धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यात यावे. प्रति एकरी 20 क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी खा. प्रफुल पटेल यांनी केली.

खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, राजूभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, सरिता मदनकर, अविनाश ब्राह्मणकर, दिपलता समरीत, नंदूभाऊ समरीत, सविता ब्राह्मणकर, भुमाला डुंबरे, पद्माकर गहाणे, अंगराज समरीत, सरीता फुंडे, जयाताई भुरे, शमीला वरकडे, बालूभाऊ चुन्ने, सुरेश पाटील कापगते, रामचंद्र कोहळे, हेमकृष्ण वाडीभस्मे, सुरेश बघेल, अनिल टेंभरे, प्रभाकर सपाटे, शैलेश गजभिये, निखिल जिभकाटे, सुरेखा शहारे, तिलोतम्मा राऊत, सतीश समरीत, सुरेश बोरकर, रवी राऊत, राजू हटवार, राजेश चंदवानी, लीनप्रकाश राऊत, अजय जवंजाळ, प्रशांत राऊत, परशु लांजेवार, अमर जगीया, दर्शन कटकवार, सहित साकोली तालुका व शहर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment